नागपूर : पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘बालहट्ट’ नडल्याचे आज सिध्द झाले, मुख्यमंत्र्यांच्या बालहट्टामुळे या गौरवशाली परंपरेला काळा डाग लागला असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या समोर टाकलेल्या मंडपाला देखील पावसाचा फटका बसला आहे. अशा स्थितीत कार्यालयात अंधारात बसून जयंत पाटील सरकारवर बरसत होते. यावेळी ते मेणबत्ती लावून बसले होते.
हे देखील वाचा
कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसताना केवळ निष्काळजीपणा व दुरदृष्टीचा अभाव असलेलं हे सरकार केवळ सवंग घोषणा अन भाषणबाजीतच मश्गुल आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनाची गैरवशालू परंपरा आहे. केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील शेकडो शिष्टमंडळे अधिवेशनाचे काम पाहण्यासाठी येतात. मात्र यंदा केवळ मुख्यमंत्र्यांच्या बालहट्टामुळे या गौरवशाली परंपरेला काळा डाग बसला आहे. अशी टिका जयंत पाटील यांनी केली.