नावातच ‘जय’ असल्याने विजयाला अंत नाही

0

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावातच जय आहे, ते पक्षाला जय मिळवून देतील आणि त्या विजयाला कधीही अंत नसेल, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांच्याविषयी आत्मविश्वास व्यक्त केला. पक्षाचा नवीन प्रदेशाध्यक्ष ठरविण्यासाठी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात बैठक झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार, प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, अजित पवार, सुप्रिया सुळे, नवीन सरचिटणीस सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

पक्षाच्या कठीण काळात सुनील तटकरे यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. `हल्लाबोल`च्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न मांडले. टीकेची पर्वा केली नाही. नवीन अध्यक्ष यांच्या नावात जय आहे. ते जय मिळवून देतील आणि त्या विजयाला कधीही अंत नसेल. पक्ष संघटना मजबूत करण्याचे आव्हान आहे. जनतेने बदल करण्याचे ठरवले आहे. तो मतपेटीत उतरवायचा आहे, असे मुंडे यांनी सांगितले.