बंगळूर-कर्नाटकातील राजकीय वातावरण सातत्याने किचकट होताना दिसत आहे. भाजपाने काँग्रेसचे काही लिंगायत आमदार आमच्या बाजूने असल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे काँग्रेस आमदाराने आपल्याला भाजपाकडून पाठिंब्याच्या बदल्यात मंत्रिपद देण्याची ऑफर दिल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, आता जेडीएसचे दोन आमदार अचानक गायब झाले आहेत. आमदार राजा व्यंकटप्पा नायक आणि वेंकट राव नाडगौडा अशी त्यांची नावे आहेत.
सध्या बेंगळुरू येथे सुरू असलेल्या जेडीएसच्या आमदारांच्या बैठकीत ते हजर राहणे अपेक्षित होते. आता त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. दरम्यान, पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत एचडी कुमारस्वामी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
JD(S)' MLAs Raja Venkatappa Nayaka and Venkata Rao Nadagouda are missing from the JD(S) legislative party meeting which is going on in a hotel in Bengaluru. #KarnatakaElections2018 pic.twitter.com/oRASjpqwjd
— ANI (@ANI) May 16, 2018
जेडीएसचे नेते मंजूनाथ यांनी कुमारस्वामी आमचे मुख्यमंत्री असतील आणि काँग्रेसच्या साथीने आम्ही सरकार स्थापन करू असे म्हटले. आम्ही कोणाच्याही प्रभावाखाली नाही हेही त्यांनी स्पष्ट केले.
HD Kumaraswamy chosen as legislative party leader in a meeting of the JD(S) MLAs in Bengaluru. #KarnatakaElection(file pic) pic.twitter.com/NWkWuLitFa
— ANI (@ANI) May 16, 2018