नवी दिल्ली: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (IIT) कडून घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स 2020 (JEE Advanced 2020) परीक्षेचा निकाल आज सोमवारी ५ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)