नवी दिल्ली – सीबीएसईच्या जेईई मुख्य परिक्षेचा आज निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेडचा पार्थ लटुरिया देशात तिसरा आला आहे. पार्थचे आई वडिल व्यवसायाने डॉक्टर असून तो लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी राहिला आहे. त्याला पुढे आयआयटी मुंबईमधून संगणक विज्ञानाचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. आयआयटी मुंबई ही देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण देणारी संस्था आहे. यावर्षी तांत्रिक उच्च शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी जवळजवळ १४ लाख विद्यार्थ्यांनी जेईईची मुख्य परीक्षा दिली होती. ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने झाली होती.