वाशिंगटन: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी कालपासून सुरु आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बिडेन यांच्यात अटीतटीची लढत झाली. दरम्यान काही तासांत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? हे स्पष्ट होईल. मात्र डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. संपूर्ण जगासाठी अनपेक्षित असा हा निकाल आहे. डोनाल्ड ट्रम्पच पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार असा अंदाज व्यक्त होत होता, मात्र ट्रम्प यांचा पराभव होतांना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बिडेन बहुमतापासून फक्त ६ जागांनी मागे आहे. बिडेन यांना २६४ (इलेक्टोरल व्होट्स) मते मिळाली आहे तर ट्रम्पला २१४ (इलेक्टोरल व्होट्स) मते मिळालेली आहे. ट्रम्प मोठ्या पिछाडीवर असल्याने पराभव निश्चित आहे.
अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नवा विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. बुधवारी अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये बायडेन यांनी सर्वाधिक मत मिळवण्याचा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा विक्रम मोडीत काढला आहे.