या विमानतळाला दिले जाणार स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव; या तारखेला उद्घाटनाची शक्यता

0

नवी दिल्ली-नोएडा इंटरनेशनल एयरपोर्टचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबर रोजी करू शकतात. २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. याचे औचित्य साधून पंतप्रधान जेवर विमानतळाचे उद्घाटन करणार असल्याचे बोलले जात आहे.

या विमानतळाला स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा प्रशासन कामगिरीला लागली असून काम लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने काम करीत आहे. दुसरीकडे ग्रेटर नोएडा मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण देखील करण्याचे प्रयत्न आहे.