रांची: महाराष्ट्र आणि हरयाना विधानसभा निवडणूक संपली आहे. दरम्यान आता झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहे. झारखंडची निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे. २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. निकाल 23 डिसेंबर रोजी जाहीर होईल.
पहिला टप्पा (13 जागा) – 30 नोव्हेंबर, दुसरा टप्पा (20 जागा) – 7 डिसेंबर, तिसरा टप्पा (17 जागा) – 12 डिसेंबर, चौथा टप्पा (15 जागा) – 16 डिसेंबर, पाचवा टप्पा (16 जागा) – 20 डिसेंबरला असणार आहे.