बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जीवंत जाळलं

0

रांची :- एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला जाळून ठार केच्याची घटना झारखंडमधील छत्रा जिल्ह्यात शुक्रवारी घडली. याप्रकरणी १८ पैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी गुरूवारी या युवतीवर तिच्याच घराजवळ सामूहिक बलात्कार केला होता. मुलीचे कुटुंबिय विवाह सोहळ्यासाठी बाहेर गेले होते. या प्रकाराची माहिती मिळताच गावात पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीच्या बैठकीत आरोपींना ५० हजार रुपये दंड आणि शंभर उठाबशा काढण्यास फर्मावण्यात आले. मात्र भुईयां याने दंड न भरता पीडित तरुणीच्या घरात धाव घेतली आणि तिच्या पालकांना मारहाण करत घराला आग लावली, यावेळी पीडित मुलगी घरातच होती. तरुणीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी ती मृत असल्याचे जाहीर केले.