राहुल गांधी यांना धक्का; निकटवर्ती रणदीप सुरजेवाला यांचा पराभव !

0

जिंद – सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. जिंद विधानसभा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कृष्णलाल मिश्रा यांनी १२ हजार ९३५ मतांनी विजय मिळवला आहे. जननायक जनता पार्टीचे दिग्विजय सिंह चौटाला ३७ हजार ६३१ मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले. तर काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना २२ हजार ७४० मतांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

रणदीप सुरजेवाला हे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अगदी निकटवर्ती मानले जातात. ते कॉंग्रेसचे प्रवक्ते देखील आहेत.