जिओ इन्स्टिट्युटच्या कुलगुरूपदी माशेलकर?

0

मुंबई- ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची नॅशनल रिसर्च प्रोफेसर म्हणून २०१६ मध्ये पुन्हा नियुक्ती करण्यात आली. त्यापाठोपाठ आता जिओ इन्स्टिट्युटच्या कुलगुरूपदीही त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. रिलायन्स फाऊंडेशनने या पदासंदर्भात त्यांना विचारणा केली असल्याची माहिती समोर येते आहे. तर उपकुलगुरू म्हणून दीपक जैन यांची निवड करण्यात येऊ शकते अशीही शक्यता आहे. माशेलकर आणि जैन हे रिलायन्स इंडस्ट्रिजचे बोर्ड मेम्बर्स आहेत. रिलायन्स फाऊंडेशन टीमचा एक भाग असतील जी रिलायन्समधे नेतृत्वक्षमता विकसित करणाऱ्या कोअर ग्रुपचा एक भाग असतील अशी शक्यता आहे.

दीपक जैन हे ससिन ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटचे माजी संचालक होते. त्यांना उप-कुलगुरुपदासाठी विचारणा करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. रघुनाथ माशेलकर आणि दीपक जैन हे दोघेही सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नियामक मंडळावर आहेत.

कर्जत भागातील ८०० एकर जागेवर जिओ इन्स्टिट्युट वसणार आहे. ज्यामध्ये १० शाळा असतील. इंजिनिअरींग, मेडिकल सायन्स, खेळ, कायदा, परफॉर्मिंग आर्ट, शहर व्यवस्थापन हे आणि असे इतर विषयांवर आधारित या शाळा असतील. जगभरातल्या ५०० विद्यापीठातल्या निवडक शिक्षकांची निवड या शाळांमध्ये केली जाणार आहे. तसेच या जिओ इन्स्टिट्युटमध्ये रिसर्च सेंटरही असणार आहे.