‘परमाणु’नंतर जॉन अब्राहम घेऊन येतोय हा देशभक्तीपर चित्रपट

0

नवी दिल्ली-जॉन अब्राहम यांची मुख्यभूमिका असलेला आणि भारतीय अणुचाचणीवर आधारित परमाणु हा चित्रपट नुकताच प्रदर्शित होऊन गेला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली धमाल कमाई केली आहे. या चित्रपटानंतर जॉन अब्राहम दुसरा देशभक्तीपर चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘सत्यमेव जयते’ असे आहे. मिलप मिलन झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात मनोज बाजपेयी देखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट टी-सिरिज ‘भूषण कुमार आणि निखील अडवाणी यांनी तयार केला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.