जे टी महाजन इंग्लिश मिडियम स्कूल, फैजपूर येथे गणपती बनवणे कलास्पर्धा संपन्न

    भुसावळ प्रतिनिधी दि 22

जे टी महाजन इंग्लिश मिडियम स्कूल, फैजपूर मध्ये गणपती बनवणे ही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये माती किंवा क्ले पासून गणेशाची मूर्ती न बनवता आपल्या सभोवताली सहज उपलब्ध असणाऱ्या विविध वस्तूंच्या मदतीने गणेशाची मूर्ती साकार करण्याचे कौशल्य दाखवण्यासाठी संधी देण्यात आली. या अंतर्गत विद्यालयातील एकूण ११२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व आपल्या कलाकुसरीचा कस लावत सुंदर व आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांनी या अंतर्गत कागद, पाने-फुले, स्वयंपाक घरातील विविध फळभाज्या, डाळ, काडी, रंग, थर्माकोल, नारळ, नारळाची साल, खोबरे, स्वयंपाक घरातील विविध आकाराची भांडी, शालेय भूमिती साहित्य अशा अनेकविध वस्तूंचा वापर करून आपापल्या परीने सुबक अशी गणेश मूर्ती चित्रित केली.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींपैकी अनेक मूर्ती मनमोहक होत्या. यांपैकी ( इ१ली व २री) अ गटात इ१ली चा विद्यार्थी बुद्धेश योगेश तायडे याने आपली सर्वोच्च कला सादर करून प्रथम क्रमांकावर बाजी मारली तर इ.१ली चा विद्यार्थी समर्थ गिरीश बावस्कर याने बनविलेल्या बाप्पाच्या मूर्तीला द्वितीय स्थान प्राप्त झाले गट ब ( इ३री व ४थी)अंतर्गत इ.४थी ची विद्यार्थिनी मनस्वी विशाल बोरोले हिने बनविलेले मनमोहक बाप्पाचे स्वरूप प्रथम स्थानाचे मानकरी ठरले. तर विद्यार्थिनी स्वानंदी योगेश पोते( इ.३री ) हिने दुसरा क्रमांक प्राप्त केला . गट क अंतर्गत (इ५वी व ६वी) विद्यार्थिनी दिव्या विकास चौधरी(इ.५वी) हिचा प्रथम व लावण्या उमाकांत धांडे(इ.६वी) हिचा द्वितीय क्रमांक आला. गट ड (इ.७वी व ८वी) मध्ये विद्यार्थिनी वैष्णवी नरेंद्र कपले(इ.७वी) हिने प्रथम क्रमांक पटकावला तर भाविका गिरीश पाटील(इ.८वी) हिने दुसरे स्थान प्राप्त केले. तर इ गटातून ( इ.९वी व १०वी ) इ.१०वी ची विद्यार्थ्यांनी भाविका पंकज महाजन हिचा मोरया प्रथम ठरला. तर सोहम निलेश चोपडे ने केलेल्या आकर्षक मूर्तीला द्वितीय स्थान प्राप्त झाले. या स्पर्धेसाठी विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव व विद्यालयातील कलाशिक्षिका वैशाली किरंगे यांनी परीक्षक होते

वरील कलाकार विद्यार्थ्यांना प्राचार्य महोदयांच्या हस्ते बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव, पर्यवेक्षिका पूनम नेहेते, विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांनी साकार केलेल्या मनमोहक अशा गणेशाच्या विविध कला मूर्तीं साकार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.