बंगळूर-कर्नाटक सत्ता स्थापनेबाबत न्यायालयात सुनावली घेण्यात आली. उद्या ४ वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुमारे तासाभराच्या सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात न्या. ए के सिक्री यांनी व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालेला जोक सांगताच काही काळासाठी न्यायालयातील तणाव कमी झाला. न्या. सिक्री यांनी व्हॉट्स अॅपवरील विनोदाचा दाखला दिला.
तणाव काही अंशी कमी
ईगलटोन रिसोर्टचा मालकही सत्तास्थापनेचा दावा करतो. त्याच्याकडे ११७ आमदारांचे संख्याबळ आहे, असे त्यांनी सांगितले. फोडाफोडीचे राजकारणा होऊ नये यासाठी कॉंग्रेस, जेडीएसच्या आमदारांना रेसोर्टमध्ये मुक्कामी ठेवण्यात आले असल्याने हा विनोद केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाकडे सर्वांचेच लक्ष असले तरी त्या विनोदामुळे काही काळ तणाव काही अंशी कमी झाली हे मात्र नक्की.
कर्नाटकमधील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला असून काँग्रेसने राज्यपाल वजूभाई वाला यांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले आणि गुरुवारी सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. याविरोधात काँग्रेस व जनता दल सेक्यूलर पक्षाने याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान भाजपाच्या वतीने बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस व जनता दल सेक्यूलर या पक्षाचे आमदारही राज्याबाहेर आहेत, त्यांना यायला वेळ लागेल, असा युक्तिवाद भाजपाची बाजू मांडणारे अॅड. मुकुल रोहतगी यांनी केला.