नवी दिल्ली-१९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी आज तब्बल ३४ वर्षानंतर दिल्लीच्या उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी सुनावणी करतांना कोर्टाचे न्यायाधीश यांना रडू कोसळले. शीख बांधवांचे वकील देखील मुद्दे मांडताना रडत होते असे चित्र सुनावणी वेळी दिसून आले.
इतक्या वर्षानंतर हा निकाल लागल्याने पीडित कुटुंबियांना रडू कोसळले.
सज्जन कुमार यांना शीख विरोधी दंगली भडकविण्याच्या आरोपाखाली शिक्षा झाली आहे. पाच लाखांचा दंड व जन्मठेप अशी शिक्षा त्यांना देण्यात आली आहे. सज्जन कुमार यांच्यासोबतच माजी आमदार महेंद्र यादव आणि किशन खोखर यांच्या शिक्षेत वाढ करण्यात आली असून १०-१० वर्षांनी शिक्षा वाढविण्यात आली आहे.