जुलै, ऑगस्टमध्ये पुन्हा बँक कर्मचाऱ्यांचा संप

0

चेन्नई-मे महिन्याच्या अखेरीस दोन दिवस संप केल्यानंतरही पगारवाढीबाबत अपेक्षित निर्णय न झाल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेत अस्वस्थता आहे. पगारवाढीच्या मुद्द्यावर जुलै व ऑगस्टमध्ये हे आंदोलन नव्याने छेडण्यात येईल, असा इशारा द युनायटेड फेडरेशन ऑफ बँक युनियन्सने दिला आहे. देशभरातील नऊ बँक कर्मचारी संघटनांचा महासंघ असणाऱ्या या फेडरेशनचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी ही माहिती दिली.

या महासंघाच्या नेतृत्वाखाली देशभरातील खासगी व सरकारी बँकांतील कर्मचारी ३० व ३१ मे रोजी संपावर गेले होते. पगारवाढीचा प्रस्तावित करार लांबल्याने व बँक असोसिएशनने केवळ दोन टक्के पगारवाढ सुचविल्याने हा संप झाला होता. वेंकटचलम म्हणाले की, मेमधील संपानंतरही पगारवाढीबाबत काही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या प्रश्नी आम्ही लवकरच सरकारमधील उच्चपदस्थांची तसेच, वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतरही काही मार्ग न निघाल्यास जुलै व ऑगस्टमध्ये पुन्हा आंदोलन करण्यात येईल.