जुगारात हरला पत्नीला, जिंकणाऱ्यानी केला बलात्कार

0

ओडिशा- ओडिशाच्या बालासोर येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जुगारात पणाला लावले आणि हारला. त्यानंतर जिंकणाऱ्या व्यक्तीने पत्नीवर बलात्कार केला आणि धक्कादायक म्हणजे या दरम्यान पत्नीचा बचाव करण्याऐवजी तिचा पती बलात्काऱ्याची मदत करत होता, असा आरोप पीडितेने केला आहे.

पती पाहत होता गंमत
३५ वर्षीय पीडितेने पोलिस स्थानकात केलेल्या तक्रारीनुसार, २३ मे रोजी तिच्यासोबत बलात्कार झाला. आरोपीने पतीच्या सहमतीने बलात्कार केला. बलात्काराचा विरोध करत असताना पतीने माझी मदत करण्याऐवजी माझं तोंड दाबलं आणि मला बांधून ठेवले, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडिता दोन मुलांची आई आहे. पीडितेच्या पतीला जुगाराचं व्यसन असल्याचा दुजोरा गावकर्यांनी दिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुगारात त्याने आपल्या पत्नीला पणाला लावलं आणि तिलाही तो गमावून बसला अशी माहिती गावकर्यांनी दिल्याचे या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस अधिकारी के. एस. पढी यांनी सांगितले.

मात्र, पढी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, २८ मे रोजी आम्ही हैराण झालो कारण पीडिता आपल्या पती आणि काही गावकऱ्यांसोबत पोलीस स्थानकात आली, आणि तक्रार मागे घेत असल्याचं तिने सांगितले. मात्र, लगेचच दुसऱ्या दिवशी (दि. २९) ती पुन्हा पोलीस स्थानकात आली आणि आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत असं पढी म्हणाले.