सुप्रीम कोर्टाचा कॉंग्रेसला झटका; के.जी.बोपय्या हंगामी अध्यक्षपदी कायम

0

नवी दिल्ली-कर्नाटकात सत्ता स्थापनेवरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री यांना आज ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आलेले असतांना हंगामी अध्यक्ष निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपने के.जी.बोपय्या यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली. याला कॉंग्रेसने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबत आज सुनावनी झाली असता न्यायालयाने बोपय्या यांची नेमणूक कायम ठेवली आहे. हा कॉंग्रेसला मोठा धक्का असून भाजपला दिलासा मनाला जात आहे.

बहुमत चाचणी होणार 

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना न्यायालयाने ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले असल्याने ४ वाजता होणारी बहुमत चाचणी के.जी.बोपय्या यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

ज्येष्ठ  विधानसभा सदस्याला हंगामी अध्यक्षपदी नेमणूक करण्याचे आदेश दिले आहे. मात्र भाजपने हा आदेश डावलत  के.जी.बोपय्या यांची नेमणूक केली होती, यास कॉंग्रेसने आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कॉंग्रेसने सेवा ज्येष्ठतेनुसार आर.व्ही.देशपांडे यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी केली होती.

बोपय्या यांच्या अध्यक्षतेखालील बहुमत चाचणी नको

काँग्रेसच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. आमदारांचा शपथविधी हा बाब वेगळी आहे. पण बोपय्या यांच्या अध्यक्षतेखालील बहुमत चाचणी नको, असे त्यांनी सांगितले.