जकार्ता : आशिया क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये आतापर्यंत देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारताच्या संघाला दक्षिण कोरियाकडून फक्त एका गुणाने पराभव पत्करावा लागला. कोरियाने या लढतीत भारतावर 24-23 असा विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीपासून कोरियाने सामन्यावर पकड मजबूत केली होती. कोरिया आणि भारत यांच्यातील गुणांमध्ये जास्त फरक दिसत नव्हता, पण प्रत्येक वेळी कोरियानेच आघाडी घेतलेली होती. अखेरच्या सेकंदामध्ये भारताच्या अजय ठाकूरने अखेरची चढाई करायला घेतली. त्यावेळी कोरियाचे 23 आणि भारताचे 22 गुण होते. यावेळी जर अजयने दोन गुण मिळवले असते, तर भारताला विजय मिळवता आला असता. त्याचबरोबर जर एक गुण मिळवता आला असता तर हा सामना 23-23 असा बरोबरीत सुटला असता.