‘कबीरसिंग’ची घौडदौड सुरूच; २६० कोटींचा टप्पा ओलांडला !

0

नवी दिल्ली: अभिनेता शहीद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिकेत असलेला ‘कबीरसिंग’ हा चित्रपट तरुणाईला प्रचंड भावला आहे. त्यामुळेच चित्रपटाने आतापर्यंत बक्कल कमाई केली आहे. चार आठवडे उलटूनही चित्रपट प्रेक्षकांवर भुरळ घालत आहे. त्यामुळेच आतापर्यंत ‘कबीरसिंग’ने २६१.५९ कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपट क्षेत्रातील जाणकार तरण आदर्श यांनी ही माहिती ट्वीट केली आहे.

पहिल्या दिवसापासून कबीरसिंगने कमाईचा आकडा वाढता ठेवला आहे. भारतीय बॉक्स ऑफिससह परदेशात देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.