‘कबीर सिंह’ सुसाट; शंभर कोटींकडे वाटचाल

0

नवी दिल्ली: अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.२१ कोटी रुपयांची कमाई केली असून शाहिदच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती उतरल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई सुरुच आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 88 कोटींचा टप्पा ओलांडला असून लवकरच 100 कोटींच्या घरात पोहोचेल. चार दिवसातील ही कमाई आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘कबीर सिंग’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिन दिवसात तब्बल 88.37 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले आहे. तसेच शाहिद कपूरच्या ‘पद्मावत’ चित्रपटानंतर प्रदर्शनाच्या तिन दिवसात सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट असल्याचे देखील सांगितले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.२१ कोटी, दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी तिसऱ्या दिवशी 27.91 तर चौथ्या दिवशी 17.54 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठेल अशी शक्यता तरण आदर्श यांनी व्यक्त केली होती आणि आता त्यांचा अनुमान योग्य ठरल्याचे पाहायला मिळत आहे.