कादर खान यांच्या अभिनयामुळे रुपेरी पडद्याला अधिक चमक मिळाली-मोदी

0

नवी दिल्ली-हिंदी सिनेसृष्टीतील विनोद ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधानानंतर राजकीय, सिने जगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कादर खान यांच्या अभिनयामुळे रुपेरी पडद्याला अधिक चमक मिळाली असे सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

तसेच मोदींनी कादर खान यांच्या कुटुंबियांच्या दुखात आपण सहभागी असल्याचे सांगत कुटुंबियांना आधार दिला आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील कादर खान यांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. कुटुंबीयांसोबत असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.