यावल शहरातील बँन्ड पार्टी दुनियेतील दोन दिग्गज भाऊ कालु मास्टर व मास्टर अक्रम खान यांचे अल्पशा आजाराने निधन
यावल ( प्रतिनिधी ) यावल शहरातील दोन बॅन्ड पार्टी च्या रूपाने संपुर्ण महाराष्ट्रात यावल शहराची आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे एस एच ब्रॉस बॅड पार्टीचे मालक मास्टर अक्रम खान यांचे दिनांक ३० ऑगस्ट रोजी ह्दयविकाराच्या विव्र झटक्याने आणी युसुफ ब्रॉस बँन्ड पार्टीचे मालक कालु मास्टर यांचे २८ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . यावल येथील प्रसिद्ध युसुफ ब्रास बॅन्ड वाजंत्रीचे मालक तथा माजी नगरसेवक कालु मास्टर वय ६२ वर्ष यांचे अल्पशा आजाराने एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत असतांना निधन झाले व तर त्यांचे आत्याभाऊ व त्यांचे मामेभाऊअसे प्रसिद्ध एस एच खान ब्रॉस बॅन्ड पार्टीचे मालक मास्टर अक्रम खान सांडे खान वय ५७ वर्ष यांचे ही उपचारा दरम्यान निधन झाले असून, यावल शहरात ब्रास बॅन्डच्या वांजत्रीच्या क्षेत्रात एकच शोककळा पसरली आहे .