कमल हसनने घेतली राहुल गांधींची भेट

0

नवी दिल्ली-बॉलीवूड अभिनेते व नुकतेच तामिळनाडूच्या राजकारणात सक्रीय झालेले कमल हसन यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांच्यात देशातील तसेच तमिळनाडूतील राजकारणाबाबत चर्चा झाली. तसेच पक्षाच्या विविध मुद्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. राहुल गांधी यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे.