मोदींप्रमाणे कलमनाथ यांनाही पदाचा लाभ मिळाला पाहिजे-शशी थरूर

0

नवी दिल्ली:आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असणार कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एक विधान केले आहे. १९८४ मध्ये शीख विरोधी दंगली भडकविण्याचे आरोप मध्य प्रदेशचे होऊ घातलेले मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही गुजरात हत्याकांडाचे आरोप आहे. मात्र त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही. मोदींना ज्याप्रमाणे पदाचा लाभ मिळाला तसाच लाभ कमलनाथ यांना देखील मिळायला हवा असे विधान शशी थरूर यांनी केले आहे.

कमलनाथ यांच्याविरोधात शीख विरोधी दंगलीचे आरोप असल्याने कॉंग्रेस नैतिक मूल्य जपत नसल्याचे प्रश्न शशी थरूर यांना विचारण्यात आले असता त्यांनी हे विधान केले. २००२ च्या गुजरात दंगलीत मोदींचे नाव सामील आहे. मात्र कोणतेही पुरावे नाही. कमलनाथ यांच्याविरोधात देखील पुरावे नाही.