भोपाळ: कर्नाटक, गोवा नंतर भाजपचे लक्ष मध्य प्रदेश वर टिकून आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून तसे संकेत मिळाले आहे. खबरदारी म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या पक्षातील मंत्र्याला चार आमदार सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.कमलनाथ सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना भाजपाचे मध्य प्रदेश मधील माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कर्नाटक, गोवाचे वादळआता हळूहळू मध्यप्रदेश कडे येत असल्याचे सोशल मिडीयाद्वारे दिले होते.
मध्य प्रदेश मधील एका मंत्र्याने सांगितले की, कमलनाथ सरकारवर कोणतेही संकट नसल्याचा दावा केला आहे. हे सरकार आपल्या ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे दुसऱ्या मन्त्राय्ने म्हटले आहे. भाजपा गेल्या ७ महिन्यांपासून स्वप्न बघत आहे. जे अद्याप साकार झालं नाही असा टोला मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी भाजपाला लगावला आहे.
२०१८ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपाला १०९ तर काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. भाजपातील एका आमदाराला खासदारकीची संधी मिळाल्यामुळे भाजपाची संख्या १०८ झाली आहे. भाजपाला सरकार स्थापनेसाठी आमदारांची गरज आहे. काँग्रेस सरकारला समाजवादी पक्ष, बसपा आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. बसपा आमदाराने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तो आमदार सध्या नाराज आहे.