मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसची दमदार कामगिरी: शेतकऱ्यांना देणार पेन्शन !

1

भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये सत्तेत येण्यापूर्वी दिलेले आश्वासनपूर्तीकडे कमलनाथ सरकारची वाटचाल सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोनच तासांत कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता आणखी मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कमलानाथ यांनी आठवभराच्या आत दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत अशा दहा लाख शेतकऱ्यांना महिन्याला एक हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर बाराशे कोटींचा बोजा पडणार आहे.

कलमनाथ यांनी कृषी खात्याला याबाबत सूचना आहेत. मध्यप्रदेश सरकारवर मोठा आर्थिक बोजा असला तरी शेतकऱ्यांना काही कमी पडू द्यायचे नाही. अधिकाऱ्यांनी आणि बँकांनी यातून मार्ग काढण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.