भोपाळ-मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन चार दिवस होत असतांना कमलनाथ यांनी तडकाफडकी ४२ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. अनेकवर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी बदली केली.
कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यात शेतकरी कर्जमाफी, स्थानिक तरुणांना रोजगार देणे आदी विषय आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अवघ्या दोन तासात त्यांनी कर्जमाफी केली. त्यांनी केलेली कर्जमाफी संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे.