उत्कृष्ट आगर व्यवस्थापक म्हणून कमलेश धनराळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ०३ जून रोजी सत्कार

जामनेर प्रतिनीधी l

रा .प. महामंडळाच्या ७५ व्या अम्रुत महोत्सवी वर्षानिमित्त सन २०२२ – २०२३ मधील फलनिष्पत्ती मूल्यांकनात महाराष्ट्र राज्यातील २५० आगारापैकी ९ अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगार व्यवस्थापक यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात येणार असून यामध्ये जामनेर आगाराचे आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे दि. ०३ जून २०२३ रोजी यथोचित असा सत्कार आणि गौरव करण्यात येणार आहे, यानिमित्ताने आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे हे तारीख 25 मे 2016 पासून जामनेर डेपोत आगार व्यवस्थापक म्हणून आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडत आहेत मागील आर्थिक वर्षात 2022-2023 मध्ये महाराष्ट्रात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या आगरांपैकी जामनेर आगार असून आगाराने सातत्याने चांगली कामगिरी केलेली असल्याने ग्रामविकास मंत्री मा गिरीश महाजन माजी नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे या उत्कृष्ट आगार व्यवस्थापक पुरस्कारा मिळाल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न यात असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे आभार श्री कमलेश धनराळे यांनी मानले आणि आगारातील सर्व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .