भुसावळ:- तालुक्यातील कंडारी येथे पाणीप्रश्न गंभीर बनल्याने उपाययोजना करण्यासंदर्भात दीपनगरचे मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. गावाला तापी नदीचे वरदान असतानाही ग्रामस्थांना कृत्रिम टंचाईची झळ सोसावी लागत आहे. निवेदन देताना जि.प.सदस्य तथा तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष निसाळकर, कंडारीचे सरपंच पती संदीप शिंगारे, माजी सरपंच दिलीप मोरे, ग्रामपंचायत सदस्य विनायक वासनिक आदींची उपस्थिती होती.