मुंबई: बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत लवकरच तिच्या आगामी ‘मणिकर्णिका- क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडसह चाहत्यांमध्ये तिची जोरदार चर्चा सुरु आहे. याच चर्चांदरम्यान तिचा एक फोटो व्हायरल झाला असून या फोटोमुळे ती पुन्हा एकदा लाइमलाईट मध्ये आली आहे.
आता कंगनाच्या पर्स आणि सॅण्डलची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसापूर्वी कंगना विमानतळावर दिसून आली होती. यावेळी तिच्या पर्स आणि सॅण्डलवर अनेकांच्या नजरा खिळल्याचं पाहायला मिळालं. कंगनाच्या याच पर्स, सॅण्डलचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. कंगनाचे हे सॅण्डल एक खास डिझाईनमध्ये तयार करण्यात आले असून त्याच्यावर आगीच्या पेटलेल्या ज्वालांची डिझाईन करण्यात आली आहे.