मुंबई: अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबईतील ‘मणीकर्णिका’ या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेले कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याने बीएमसीने त्याच्यावर कारवाईची सुरुवात केली आहे. कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड सुरु झाली आहे. दरम्यान कंगनाने तोडफोडीचे फोटो ट्वीटकरत मुंबईला पुन्हा पाकिस्तानची उपमा दिली आहे. ‘पाकिस्तान, लोकशाहीची हत्या’ असे ट्वीट कंगनाने केले आहे.
I am never wrong and my enemies prove again and again this is why my Mumbai is POK now #deathofdemocracy ???? pic.twitter.com/bWHyEtz7Qy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
कंगना रानौत आज बुधवारी ९ रोजी मुंबईत येतआहे. मुंबईला येण्यासाठी ती चंडीगडहून निघाली आहे. थोड्याच वेळात ती मुंबईला पोहोचेल. तत्पूर्वी कंगना रानौतने ट्वीट केले आहे. ‘माझे कार्यालय अयोध्या या चित्रपटासाठी तयार करण्यात आले होते. परंतु त्यावर मुंबई महानगर पालिकेने हातोडा चालविला आहे. हा हातोडा माझ्या कार्यालयावर नाही तर राम मंदिरावर आहे. इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून बाबर आला आहे. बाबरकडून राम मंदिर पाडले जात आहे. मात्र आम्ही पुन्हा राम मंदिर बांधू जय श्रीराम, जय श्रीराम’ असे ट्वीट कंगना रानौतने केले आहे.