BREAKING: कंगना रानौतच्या सुरक्षेत वाढ; ‘Y+’ दर्जाची सुरक्षा

0

 

नवी दिल्ली: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री कंगना रानौत चर्चेत आल्या आहेत. कंगना रानौत यांनी बॉलीवूडमधील घराणेशाहीवर सातत्याने टीका केली आहे. मुंबई पोलिसांवर कंगनाने टीका केली होती. त्यानंतर कंगना विरुद्ध महाराष्ट्र सरकार असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान हिमाचल प्रदेश सरकारने केंद्र सरकारकडे कंगना रानौतच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची शिफारस केली होती, ती मान्य करण्यात आली असून कंगनाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. ‘Y+’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे आता कंगनाच्या सुरक्षेसाठी ११ जवान तैनात राहणार आहे. कंगनाच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढविण्याची मागणी करण्यात आली होती.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्यानंतर कंगनाने गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले आहे. आता कोणत्याही देशभक्तीची भावना दाबली जाणार नाही, भारताच्या एका कन्येचा स्वाभिमान आणि आत्मसन्मानचा मान राखला गेला असे ट्वीट कंगनाने केले आहे.