कन्हैया कुमारला सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान

0

तिरुवनंतपूरम: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) राष्ट्रीय कार्यकारिणीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनानंतर प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला स्थान मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाचे विद्यार्थी शहला रशीद आणि कन्हैया कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. या दोघांनी भाजपला विरोध केला आहे. कन्हैया कुमार यांनी नेहमी भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. .

कन्हैया कुमार हा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता असून शहला रशीद ही जेएनयूतील पीएचडीची विद्यार्थीनी असून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनची उपाध्यक्ष होती. दरम्यान, सीपीआय मधील पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलून कन्हैया कुमारला राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिल्यामुळे सीपीआयमधील एका गटात नाराजी पसरली आहे.

कोल्लाम येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात एस. सुधाकर रेड्डी यांची सलग तिसऱ्यांदा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. याशिवाय, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या १२५ सदस्यांच्या नावांचीही यावेळी घोषणा करण्यात आली. यामध्ये कन्हैया कुमारला स्थान देण्यात आले आहे.