कपिल शर्मावर उपचार

0

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या आपल्या करियरच्या मोठ्या जडणघडणीतून जातोय. कपिल डिप्रेशनमधून जात असल्याच त्याच्या जवळचे सांगत आहेत. त्याला घेऊन अनेक चर्चा आणि अफवा पसरवल्या जात आहेत. दरम्यान कपिल शर्मावर रिहॅब सेंटरला उपचार सुरु आहे. गेल्या वर्षी कपिल शर्मा कोणत्याना कोणत्या वादात अडकला होता. कपिलचा मानसिक आजार, दारुच्या नशेत शिवीगाळ करण्याचे अनेक प्रकरण समोर आली होती.

स्पॉटबॉय वेबसाइटचा संपादक विकी लालवानीसोबतही कपिलने दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याचा ऑडियो समोर आलाय. ज्यानंतर कपिलने विकी लालवाणी आणि आपली एक्स मॅनेजर आणि गर्लफ्रेंड निति आणि प्रितीवरही आरोप करत पोलीसात तक्रार केली होती. याकाळात कपिल टेलिव्हिजनपासून दूर गेला. काही दिवसांपूर्वी त्याने कॉमेडी शो सुरू केला. मात्र ट्विटरवर काही वादग्रस्त ट्विट लिहल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. अभिनेत्री शिल्पा शिंदेने पोस्ट शेअर करून कपिल शर्माला स्पेस आणि पुरेसा वेळ द्यावा अशी मीडियाकडे मागणी केली आहे.