साध्वी यांच्या वक्तव्याने पंतप्रधान शांत का? कपिल सिब्बल

0

नवी दिल्ली: प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर देशाचे पंतप्रधान यांनी मौन का बाळगले आहे?. असा प्रश्न कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. या बाबत त्यांनी मोदींवर टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कपिल सिब्बल यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांना थोर देशभक्त म्हटले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपच्या भोपाल मधील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी माफी मागितली. या त्यांच्या विधानामुळे थोर नेत्याचा अपमान झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.