कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे के.जी.बोपय्या

0

बंगळूर- कर्नाटकात सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झालेले आहे. मुख्यमंत्री निवडीचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. मुख्यमंत्री पदाबरोबरच हंगामी अध्यक्ष निवडीवरून पेच निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हंगामी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विधान सभा सदस्याची निवड करण्याचे आदेश दिले आहे.  दरम्यान भाजपचे के.जी.बोपय्या यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

बोपय्या हे  विधानसभेचे माजी अध्यक्ष आहे. विधान सभेच्या हंगामी अध्यक्ष निवडीवरून चढाओढ सुरु होती. कॉंग्रेसतर्फे अध्यक्ष पदासाठी आर.व्ही.देशपांडे तर भाजपकडून उमेश कट्टी यांची निवड होणार असे बोलले जात होते.

कॉंग्रेस आक्रमक

के.जी.बोपय्या हे भाजपचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करून घेण्याचे आदेश दिले असतांना भाजपने हे आदेश झुगारून बोपय्या यांची निवड केली असल्याने कॉंग्रेस आक्रमक झाले आहे. या निवडीविरोधात कॉंग्रेस पुन्हा न्यायालयात जाणार आहे.