बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण

0

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे कर्नाटकमधील सत्ता संघर्षाकडे लक्ष लागले आहे. कर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत चाचणी होणार असून या चाचणीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाचे नेते आणि माजी वादग्रस्त सभापती के. जी. बोपय्या यांची नियुक्ती केली. हंगामी अध्यक्ष हा सर्वाधिक काळ आमदारकी भूषविलेला सदस्य असणे आवश्यक असताना ही नियुक्ती केली गेल्याने तिलाही काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने बोपय्या यांची निवड कायम ठेवली आहे.

 

धोरणात्मक निर्णयास मनाई

कर्नाटकात येडियुरप्पांना आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दुपारी चार वाजता कर्नाटकच्या राजकारणाचे पुढचं चित्र ठरणार आहे. बहुमत सिद्ध होण्याआधी धोरणात्मक निर्णय घेण्यासही येडियुरप्पांना मनाई करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्याबाहेर गेलेले आमदार कर्नाटकात दाखल झालेत. ते आज विधीमंडळ सभागृहात कडेकोट पोलीस बंदोबस्तात काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार दाखल झालेत. सध्या सभागृहात आमदारकीचा शपथ सोहळा सुरु आहे. बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करावे लागणार आहे.