विधानसभेत चार आमदार गैरहजर

0

बंगळूर-आज दुपारी ४ वाजता भाजपला कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. भाजपकडे १०४ जागा आहे, तर बहुमतासाठी ११२ जागेची आवश्यकता आहे. दरम्यान बहुमत चाचणी प्रक्रियेस सुरुवात झाली असून आमदारांचा शपथविधी सुरु आहे. भाजपकडून सत्ता समीकरणासाठी जुळवाजुळव सुरु आहे. दरम्यान कॉंग्रेसचे दोन, जेडीएसचा एक तर भाजपचा एक आमदार विधानसभेत गैरहजर असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसचे आनंद सिंह व प्रताप गौडा पाटील गैरहजर आहे.