कर्नाटकात बहुमत चाचणी प्रक्रियेस सुरुवात; आमदारांची शपथविधी सुरु

0

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज दुपारी ४ वाजता कर्नाटक विधानसभेत सत्तास्थापनेसाठी बहुमत चाचणी होईल. तत्पूर्वी कर्नाटकातील वातावरण तापले आहे. आज मुख्यमंत्रीपदाबाबत निकाल लागणार असल्याने कर्नाटकात सर्वत्र राजकीय चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान आमदार विधानसभेत दाखल झाले असून बहुमत चाचणी संबंधी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. विधानसभे बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

भाजप आमदारांची विधिमंडळ बैठक
कॉंग्रेस जेडीएसचे आमदार विधानसभेत दाखल झाले आहे तर भाजप आमदार विधिमंडळ बैठकीसाठी शांघ्रीला हॉटेलमध्ये दाखल झाले आहे. तसेच जेडीएसचे काही आमदार बंगळुरूमधील ली मेरीडीन हॉटेलमध्ये दाखल झाले आहे.

कॉंग्रेसचे दोन आमदार गैरहजर 

आज बहुमत चाचणी असल्याने आमदार विधानसभेत दाखल झाले आहे. कॉंग्रेस, जेडीएसचे आमदार सोबत दाखल झाले. मात्र कॉंग्रेसचे दोन आमदार विधानसभेत अद्याप गैरहजर आहे. आनंदसिंह व प्रताप गौडा पाटील हे दोन आमदार गैरहजर आहे.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ
बहुमत चाचणी होणार असल्याच्या पार्श्वभुमीवर कर्नाटकच्या विधान भवनाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या बंगळुरू येथील घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.