बेंगळुरू । कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सध्या मंदिर दर्शनाला भलताच भाव चढला आहे. 3 महिन्यांपासून भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांमध्ये मंदिर आणि मठांमध्ये दर्शनासाठी जाण्याची स्पर्धा लागली आहे. राहुल गांधींनी कर्नाटकात त्यांच्या निवडणूक अभियानाची सुरुवात 10 फेब्रुवारीला मंदिर दर्शनाची सुरुवात केली होती. गेल्या 85 दिवसांमध्ये त्यांनी राज्यात आठ दौरे केले. त्यादरम्यान 18 दिवसांमध्ये ते 19 मंदिरांमध्ये गेले आहेत, तर भाजपाध्यक्ष अमित शहांनीही 27 मंदिरे आणि मठांमध्ये दर्शन केले आहे. 85 टक्के हिंदू मतदारांना केंद्रस्थानी ठेवून मंदिर मठ दर्शनाची ही स्पर्धा लागल्याचे मानले जात आहे.
राज्यात 85% हिंदू मतदार आहेत. 200 मतदारसंघांत त्यांची निर्णयक मते आहेत. 30 जिल्ह्यांमध्ये लिंगायत, कुरबा, वोक्कालिगाचे 600 हून अधिक मठ आहेत. या तीन समुदायांमध्ये सुमारे 38% मतदार आहेत. शहांनी गेल्या 75 दिवसांत 27 मंदिर मठांचे दर्शन घेतले आहे. त्या माध्यमातून 120 मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. राहुल कर्नाटकमध्ये गुजरातमधील मंदिर दर्शनाचा फॉर्म्युला पुढे नेत आहेत. ते येथे आतापर्यंत 19 मंदिरांमध्ये गेलेले आहेत तसेच चार दर्गाह, दोन चर्च आणि एका गुरूद्वारालाही त्यांनी भेट दिली आहे.