प्रचार सभेत मुख्यमंत्री झोपले

0

बंगळूर- सध्या कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कॉंग्रेस भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या प्रचार सभेत खुद्द मुख्यमंत्री व्यासपीठावर झोपा काढत असल्याचे दिसून आले. यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात मुख्यमंत्री सिद्धरमय्या निरुत्साही असून ते झोपले आहे. त्यांना इतकी झोप लागली आहे की व्यासपीठावरील उपस्थित असलेले त्यांच्याशी बोलत आहे मात्र त्यांना काहीही ठाऊक नाही.