निपाणी – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. निपाणी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार शशि्कला जोले यांच्यासमोर काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांचे आव्हान आहे.
काँग्रेसचा गड
गेल्या निवडणुकीत जोले यांच्या पारड्यात ९० हजार मते पारड्यात पडली होती. पूर्वीपासून निपाणी हा काँग्रेसचा गड मानला जातो. गेल्या निवडणुकीत भाजपला धक्कातंत्र देत जोले निवडून आल्या होत्या. विधानसभेवर निवडून जाणाऱ्या पहिल्या महिला आमदार जिल्ह्यातील ठरल्या आहेत. निवडणुकीत स्थानिक प्रश्नांसोबत मराठी अस्मितेचा मुद्दा मूळ धरू पाहत आहेत. जोले आणि काकासाहेब पाटील दोघेही तुल्यबळ उमेदवार आहेत. दोघांनीही मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत निपाणीकर कोणाच्या पारड्यात मते टाकणार यावर सत्तेची गणिते अवलंबून असतील.