कर्नाटकची जनता नाखुश-अमित शहा

0

बंगळूर-कर्नाटकमध्ये पूर्वी ४० जागा असलेल्या भाजपाने यंदा १०४ जागा जिंकल्या. यावरुन जनादेश हा काँग्रेसविरोधातच असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होत असताना कर्नाटकची जनता नव्हे तर केवळ काँग्रेस-जेडीएसच आनंद साजरा करीत आहेत, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भाजपा हा कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आमच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढही झाली आहे. यावरुन जनादेश हा काँग्रेसविरोधी असल्याचे स्पष्ट होते असे शहा यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सिद्धरामय्या हे देखील एका जागेवरून हारले तर दुसऱ्या जागेवर खूपच कमी फरकाने त्यांचा विजय झाला. त्याचबरोबर केवळ ३७ जागा जिंकणारी जेडीएस देखील कशासाठी आनंद साजरा करीत आहे. याचा खुलासा त्यांनी जनतेसमोर करावा. कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस हे एकमेकांविरोधात लढले. प्रचार काळात जेडीएसने पूर्ण प्रचार काँग्रेसविरोधात केला होता, त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांच्यात झालेली युती ही अभद्र युती आहे. मात्र, कर्नाटकमध्ये भाजापाला सर्वात मोठा पक्ष बनवून जनादेश काँग्रेसविरोधात दिल्याबद्दल मी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानतो. भाजपा कर्नाटकात १३ जागांवर नोटापेक्षाही कमी मार्रिजनने हारले, यारुन जनता भाजपाच्या बाजूने होती हे कळते असेही यावेळी शाह यांनी सांगितले.

कर्नाटकात सरकार स्थानप करणार असल्याने आता काँग्रेसला सुप्रीम कोर्ट, ईव्हीएम आणि निवडणुक आयोग या गोष्टी चांगल्या वाटत आहेत. आमच्यावर घोडेबाजाराचाही आरोप लावण्यात आला. मात्र, काँग्रेसने संपूर्ण तबेलाच विकून खाल्ला आहे. आम्हाला हक्क असल्याने आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला होता. येडियुरप्पांनी सत्तास्थापनेचा दावा करताना राज्यपालांकडे ७ दिवसांची मुदत मागितल्याचा खोटा दावा काँग्रेसने सुप्रीम कोर्टात केला. कारण तसे असते तर राज्यपालांनी त्यांच्याकडे तसे पत्र मागितले असते. कोणताही पक्ष वर्चस्ववादी होऊ शकत नाही. वर्चस्ववादी कधीही सत्तेत येत नसतात ते सत्तेत येतात ते केवळ लोकांच्या प्रेमामुळेच, असेही यावेळी शाह म्हणाले.