कर्नाटक विधानसभा अध्यक्षपदी कॉंग्रेसचे रमेशकुमार

0

बंगळूर-आज कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी विधान सभेत बहुमत सिद्ध करणार आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली. कॉंग्रेसचे रमेशकुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपने देखील आपला उमेदवार दिला होता मात्र निवडणुकीपूर्वी भाजपने अर्ज मागे घेतला त्यामुळे रमेशकुमार यांची निवड बिनविरोध करण्यात आली.