बंगळुरू: विधिमंडळ असेल किंवा संसदेच्या अधिवेशनात सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप, प्रत्यारोप होतच असतात. काही वेळा हाणामारीपर्यंत प्रकार घडतात. सभागृहामध्ये गोंधळ घालणे, अध्यक्ष, सभापतींच्या दिशेने कागदपत्रे भिरकावणे हे प्रकार होतातच. मात्र आज मंगळवारी १५ रोजी कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये लोकशाहीला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. गोरक्षा कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले मदतभेद हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यातच दोन्ही बाजूच्या सभासदांनी थेट सभापतींना त्यांच्या खुर्चीवरून उठवले.
कॉंग्रेस आमदारांकडून हा प्रकार घडला आहे.
#WATCH Karnataka: Congress MLCs in Karnataka Assembly forcefully remove the chairman of the legislative council pic.twitter.com/XiefiNOgmq
— ANI (@ANI) December 15, 2020