कर्नाटक सीमावर्ती भाग महाराष्ट्राचाच; देवेंद्र फडणवीस

0

मुंबई: महाराष्ट्र, कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षापासून चालू असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावर्ती भागात जो लढा चालू आहे, तो संपेपर्यंत सरकार त्यांच्या पाठीशी असून , हा भाग महाराष्ट्राचाच आहे असे असा दावा त्यांनी केला आहे. सीमावर्ती भागातील लोकांवर होणाऱ्या अन्याय, त्या भागातील समस्या सोडवण्यासाठी दोन मंत्र्यांची नेमणूक केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

सीमावर्ती भागातील बंद पडलेल्या मराठी शाळा सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल असे ही ते म्हणाले. सीमावर्ती भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि येथील मराठी शाळा जिवंत ठेवण्यासाठी हा लढा सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. संविधानाच्या मर्यादेत राहून आपण हा लढा सुरू ठेवू. मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी सीमावर्ती भागात फ्री टू एयर च्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारण करण्यात मदत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत सुरुवातीला सीमावर्ती भागातील समस्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या सांगितल्या. सीमावर्ती भागातील बेळगाव, कारवार, निपाणी येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी, तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, किरण ठाकूर, जगदिश कुटे आदी यावेळी उपस्थित होते.