कर्नाटकचं ठरलं! सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री

डिके शिवकुमर होणार उपमुख्यमंत्री, २० तारखेला शपथविधी

Karnataka CM : कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी झालेल्या मतमोजणीत २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्वावाद बहुमत मिळवलं आहे. तब्बल १० वर्षांनी काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता बहाल केली आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी सिध्दरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेसचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिध्दरामय्या यांच्या गळ्यात पडली आहे. तर डी.के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. सिध्दरामय्या यांनी यापुर्वीदेखील मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला आहे. तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीमंडळातील मंत्री २० तारखेला शपथग्रहण करतील, असं के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे.

आज काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक

काँग्रेसने आज (गुरूवारी) सायंकाळी सात वाजता बंगळुरूमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निरीक्षकांना सीएलपी बैठक आयोजित करण्यासाठी बंगळुरूत पोहोचण्यास सांगण्यात आलं आहे.