Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसच ‘किंग’,भाजपचा दारुण पराभव

बसवराज बोम्मई सरकारमधील तब्बल १२ मंत्र्यांचा पराभव

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. कर्नाटकमध्ये भाजप पिछाडीवर आहे तर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यानुसार काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल. कर्नाटकमधील निकालानुसार बसवराज बोम्मई सरकारमधील तब्बल १२ मंत्र्यांचा पराभव झाला आहे.

कर्नाटक विधानसभेच्या २४४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (१३ मे) पार पडली. यामध्ये आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ६४ आणि जेडीएसला केवळ २० जागांवर यश मिळालं आहे. तसेच ४ जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार निवडूण आले आहेत.

बसवराज बोम्मई सरकारमधील गोविंदा करजोला, श्रीरामुलु, व्ही. सोमण्णा, जे.सी. मधुस्वामी,वी. सोमन्ना, मुरूगेश निरानी, बी.सी. पाटील, डॉ.के. सुधाकर, एम.टी.बी. नागराज, नारायणगौडा, बी.सी नागेश, येलबुर्गा अचार, शंकर मुनेकोप्पा हे मंत्री पराभूत झाले आहेत.