कर्नाटक एक्झिट पोल : ५ पैकी एका पोलमध्ये भाजप सरकार ४ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष पण बहुमतापासून दूर 

बेंगळुरू  l कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील २२४ जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालं आहे. या जागांसाठी मतदान संपलं असून आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. दरम्यान, आता एक्झिट पोल समोर आले असून काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे जेडीएस किंगमेकर ठरण्याचीही शक्यता आहे..

झी आणि मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यांना १०३ ११८ जागा, तर भाजपला ७९-९४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर एक्झिट पोलनुसार जेडीएसला २५-३३ जागा मिळण्याची

कर्नाटक: पोल ऑफ पोल्स 24 शक्यता आहे. याशिवाय अन्यच्या खात्याता २ ते ५ जागा जाऊ शकतात. रिपब्लिक टीव्ही आणि पी पार्कद्वारे कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज बांधण्यात आलाय.. यामध्ये सत्ताधारी भाजपला ८५-१००, काँग्रेसला ९४ – १०८ आणि जेडीएसला २४-३२ जागा आणि अन्यच्या खात्याता २ ते ६ जागा जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

टीव्ही ९ पोल काय म्हणतो? 

टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात आल्यात. टीव्ही ९ नुसार भाजपला ८८ ते ९८ जागा, काँग्रेसला ९९ चे १०९ जागा आणि जेडीएसच्या खात्यात २१ – २६ जागा जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर पोलस्ट्रॅटच्या अंदाजानुसार राज्यात कर्नाटकला ८८- ९८, काँग्रेसला ९९ ते १०९ जागा मिळू शकतात असं म्हटलंय. तर जेडीएसच्या खात्यात २१ ते २६ जागा जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. काय म्हणतो सी – वोटर्सचा सर्व्हे ? सी वोटर्सनुसार कर्नाटकात भाजपला ८३ ते ९५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. काँग्रेसला १०० – ११२, जेडीएसला २१ – २९ आणि अन्यना २ ते ६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर जन की बातच्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकात भाजपला ९४-११७, काँग्रेसला ९१ – १०६, जेडीएसला १४- २४ आणि अन्यना ०-२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.